शिवसेना शाखा बोपखेलच्या वतीने समाजातील अस्सल हिरोंचा सन्मान

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,३-९-२०२१.
बोपखेल-रामनगर- गणेशनगर भागात कोविड-19 च्या काळात घरोघरी गँस सिलेंडर टाकी पोहचवण्याचे काम करणारे कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बोपखेलमधील सर्व कुटुंबाला कोरोना काळातही स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा चालू ठेवली होती. एकाही कुटुंबातील चूल बंद न पडता वेळेवर सर्वांना दोन घास मिळत होते त्यामागे या कर्मचाऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. या त्यांच्या कार्याबद्दल शिवसेना शाखा बोपखेल वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसैनिक श्री. भाग्यदेव घुले, श्री. नामदेव घुले (उपविभागप्रमुख), श्री. संतोष गायकवाड (शाखाप्रमुख)श्री‌.नंदकुमार देवकर, श्री. दत्ताभाऊ घुले, श्री. प्रल्हाद घुले, श्री.दत्ताभाऊ मोरे उपस्थित होते.

करोना पेशंटचा जाती धर्मानुसार युनूस पठाण यांच्या हस्ते अंत्य विधी करण्यात आले

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल” प्रदेश सचिव युनूस पठाण प्रभाग क्रमांक 23 धनगर बाबा मंदिराचे मागे शिवशक्ती कॉलनी मधील अमित वाघमारे यांच्या आईचा डी वाय पाटील हॉस्पिटल मधील करोना पॉझिटिव मृत्यू झाला,त्यावेळी रात्री १:०० अमित वाघमारे यांचा युनूस पठाण यांना फोन आला त्यावेळी युनूस पठाण ते डी.वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये […]

ठाणे अंमलदारच्या नातेवाईकाचा श्री युनुस पठाण यांच्या हस्ते अंत्य संस्कार करण्यात आला

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
“राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल”चे प्रदेश सचिव युनुस पठाण यांना ए.सी.पी ऑफिस मधून अंमलदार नाना झेंडे यांचा रात्री 12:00 वाजता फोन आला,त्यांचे दाजी करोना पॉझिटिव्ह रावेतच्या ओजस हॉस्पिटल मधील मृत्यू झाले,पठाण तिथं पोचले व त्यांच्या बिलाची पडताळणी केली बिल 42000 हजार आले असून त्यातले 17000 हजार कमी करून दिले व त्यांची मयत सकाळी 7 वाजता जाती धर्मा अनुसार पिंपरी लिंक रोड समशान भूमी मध्ये करून दिली!

Weekend Top