पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३०.दापोडी, विठ्ठल मंदिर वरील आळी येथे डांबरीकरण रस्त्याचे काम सुरु

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक.३०.११.२०२१.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३०.दापोडी
विठ्ठल मंदिर वरील आळी येथील डांबरी करण काम कार्यक्षम नगरसेवक रोहित आप्पा काटे, आणि संजयभाऊ कणसे, स्वि .नगरसेवक यांच्या प्रयत्नातून काम सुरू करण्यात आले.

पिंपरी . चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील बोपखेल-दापोडी जाणारया हक्काच्या रस्ता साठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकावरील गुन्हे माफ करण्यातसाठी गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांची भेट-श्री. भाग्यदेव एकनाथ घुले

*पिंपरी
संवाददाता.सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२९.११.२०२१.
बोपखेल गावच्या हक्कांच्या रस्तासाठी सुरक्षा च्या कारणास्तव ९ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता त्या मुळे बोपखेल च्या ग्रामस्थांनी रस्ता मिळवण्यासाठी आंदोलन उभे केले होते आशातच आंदोलन चिघळले गेले व त्यात अनेक माता-भगिनी -७४ वडिलधारी व पुरुष-१०२ व लहान मुलं-१३ अशी अनेक नागरिकांनवर गुन्हे दाखल करण्यात आले होते

श्री भाग्यदेव घुले म्हणाले बोपखेल च्या रस्तासाठी आम्ही नागरिक व प्रतिनिधी आदरणीय श्री. शरद पवार साहेबांनची दिल्ली येथे जनपथ-6 येथे ही भेट घेतली होती साहेबांनी त्या वेळी दिवंगत स्वरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर साहेबांनला फोन ही केला होता पण बोपखेल गावांमध्ये येण्या. जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे कष्टकरी कामगार बंधु पर्याय उरला नव्हता त्या मुळे आंदोलन पेटले व नाहक परिस्थिती ला समोर जाव लागल…
गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी लगेच सुचना केली की बोपखेल भागातील नागरिकांन वरील गुन्हे कमी करण्याचे आश्वासन दिले व लवकरच बोपखेल व उपनगरात पोलीस चौकीसाठी सुचना देतो त्या वेळी राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाचे प्रदेश सरचिटणीस शिल्पाताई बिडकर विनेश भोजे दत्ता घुले, दत्तात्रय घुले, रोहिदास जोशी, अमित टिळेकर मारुती मोरे इ. ग्रामस्थां उपस्थित होते.

दापोडीत राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीन काळी मडकी फोडून भाजपाचे निषेध आंदोलन……

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२९.११.२०२१.
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर दापोडी विभागाच्या वतीने रविवार दिनांक.२८.११.२०२१. रोजी सकाळी ११.००.वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रम नरवीर तानाजी चौक दापोडी येथे प्रसारित करून उपस्थित नागरिक कार्यकर्त्यामध्ये ऐकण्यात आला व यावेळी नागरिकांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रम निमित्त नागरिकांमध्ये चहा वाटप करण्यात आला. यानंतर भारतीय जनता पार्टी दापोडी विभागाच्यावतीने महा भकास आघाडी सरकारचा तीन मडकी फोडून जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले… यावेळी भारतीय जनता पार्टीचे सचिव विशाल वाळूंजकर यांनी राज्यातील हे सरकार गोंधळलेले आहे, त्यांचा एकमेकात ताळमेळ नाही महाराष्ट्रामध्ये मालेगाव, अमरावती दंगल व चिंचवड विधानसभेचे आमदार मा. लक्ष्मण भाऊ जगताप, यांच्या बंधू वर झालेल्या कार्यालयावरचा हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे.राज्य सरकारने पेट्रोलचे इंधनकर कमी केलेले नाहीत, मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी एक मंत्री पत्रकार परिषद घेऊन तर दुसरा मंत्री एसटी कामगारांचे आंदोलन तापवत आहे. ओबीसींचे आरक्षण , राज्यातील महत्त्वाची महामंडळे बरखास्त करणे , कोरोना काळामध्ये राज्याकडून कोणतीही मदत नसताना, नागरिकांना भरमसाठ लाईट बिल काढली गेलीत. याचाच निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीन मोकळी मडकी ज्यात बुद्धी नाही ,विचार नाही, त्यांच्या कामात योग्यता नाही अशा महा भकास आघाडी सरकारचा तीन मडकी फोडून जाहीर निषेध आंदोलन करत आहोत असे वाळुंजकर,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी स्वीकृत नगरसेवक संजय कणसे ,दापोडी- पिंपरी मंडल अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर फुगे ,विशाल सातपुते, यांनी आपल्या भाषणात निषेध व्यक्त केले, व यावेळी एस.टी कामगार च्या वतीने एसटी कामगार राजकुमार कोरे, यांनी एसटी कामगारांच्या भावांना व्यथा मांडल्या… या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा सचिव विशाल वाळुंजकर, स्वीकृत नगरसेवक संजय कणसे, मंडल अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, धर्मेंद्र शिरसागर यांनी केले. आंदोलन मध्ये अनुसूचित जाति मोर्चा सरचिटणीस यशवंत दनाने, नाना ढोकले, घनश्याम सकट, सुधीर चव्हाण, अमीर शेख, राजू कानडे,महिला आघाडी प्रभाग अध्यक्ष सविता सूर्यवंशी, वंदना वाघमारे, रेहना बैग, ॲड. सीमा कोरे, विजय वाघमारे, अशोक खोले, संगम जमादार, राहुल भोसले, प्रसाद कणसे, सौरभ काळभोर अधिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक, सूत्रसंचालन विशाल सातपुते आभार घनश्याम सकट यांनी केले

महापालिका* *आयुक्त राजेश पाटील, यांच्या आदेशानुसार* *फ्लेक्स स्वतः काढून टाका* *भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार मा.महेश लांडगे, यांचे कार्यकर्ते, समर्थकांना आवाहन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२८.११.२०२१.
पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, राजकीय दबावाखाली काम करीत आहेत. मात्र, सर्व अधिकारी आपलेच पिंपरी- चिंचवडकर आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन करा आणि त्यांना सहकार्य करा. माझ्यासाठी लावलेले शुभेच्छा फ्लेक्स काढून टाका, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, यांनी केले आहे.
पिंपरी- चिंचवड शहरात आमदार मा.महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टर काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील, यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपा आणि आमदार लांडगे समर्थकामध्ये संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, भोसरीच्या गावजत्रा मैदानावर आमदार लांडगे, यांच्या वाढदिवसानिमित्त ” रंग जल्लोष…पांडू स्पेशल” हा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी सुरू होता. सुमारे ३५ हजार लोकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात आमदार मा.महेश लांडगे, यांनी आपल्या समर्थक, हितचिंतक आणि पदाधिकारी- नगरसेवक यांना भावनिक आवाहन केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३०.दापोडी येथील आंबेडकर चौक ११ नंबर बसस्थानक परिसरात नविन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२८.११.२०२१.
प्रभाग क्रमांक ३०.दापोडी.११.नं. बस स्टॉप परिसर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात नवीन चेंबर लाईन टाकण्याचे काम नगरसेविका सौ स्वाती माई काटे. यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आले.

२६/११ च्या दहशतवादी_हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या_सुपुत्रांना आणि निरपराध नागरिकांना भोसरी पोलिस स्टेशन व शांतता कमिटी सदस्य च्या वतिने श्रध्दांजली वाहिली…

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२८.११.२०२१.
भारत मातेच्या सुपुत्रांना व निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी भोसरी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भास्कर जाधव, (साहेब) तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. जितेंद्र कदम, (साहेब) व शांतता कमिटी सदस्य श्री. भाग्यदेव ए. घुले,व सौ.आस्मिताताई कांबळे, व सौ.शिल्पाताई बिडकर, व सर्व पोलीस कर्मचारी व शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते….

शिरूर तालुक्यातील आंबळे, गावातील कुमारी.सुनीता भोसले याना पारितोषिक प्राप्त

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२७.११.२०२१.
शिरूर तालुक्यातील आंबळे गावातील कुमारी.सुनीता भोसले, या पारधी समाजातील असून, त्यांनी विचुवाचे तेल या पुस्तकाचे आत्मकथन लिहिले आहे. त्यांनी गेली कित्तेक दिवसांपासून त्यांनी आदिवासी समाजातील लोकांची समाजसेवा, सहकार्य, तसेच सेवा केल्याबद्दल त्यांना त्यांच्या या कार्याबद्दल संविधान दिनानिमित्त दिनांक.२६.११.२०२१.
रोजी सम्यक ट्रस्ट, संविधान सन्मान समिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शना खाली कुमारी.सुनीता भोसले,यांना पारितोषिक प्राप्त झाले.
यावेळी माईंड पावर टर्नर मा.दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान घेण्यात आले. यावेळी उपस्तीत रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते मा.गंगाधर आंबेडकर, ज्येष्ठ विधीतज्ञ-सामाजिक कार्यकर्ते मा.ऍड.मोहन वाडेकर, आदिवासी बांधवांचे सामाजिक कार्यकर्त्या कु.सुनीता भोसले आदी उपस्तीत होते.

एस टी* *वसाहती मधील कर्मचाऱ्यांना महापौर माई ढोरे,*यांच्या कडून* *अन्नधान्य किटचे वाटप

*महापौर माई मधील आईची माया पुन्हा दिसली*
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२७.११.२०२१. राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आई मुलाला अडचणीत बघू शकत नाही त्याचप्रमाणे महापौर माई ढोरे यांनी सांगवी येथिल एस टी वसाहती मधिल कर्मचाऱ्यांना जिवानवश्यक वस्तु व अन्नधान्याच्या किटचे वाटप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शना मध्ये केले आहे.
यावेळी श्री.जवाहर ढोरे,श्री.गणेश काची,साहिल पाचूपते,समीर पठाण,अमेय पोरे, राहुल गवारी,राहुल बांधलं,ऋषभ काची,केयूर चौव्हाण,
जे.डी.ग्रुप व सांगवी प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड* *कॉंग्रेसने केला देशाचा विकास, भाजपा करत आहे देश भकास…..डॉ. कैलास कदम

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी,
दिनांक.२७.११.२०२१.

पिंपरी, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कॉंग्रेसची महत्वपुर्ण भुमिका आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची शेती आणि औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी कॉंग्रेसने केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रासह देशभरात स्वातंत्र्योत्तर काळात पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. समाजातील सर्व घटकांनाबरोबर घेऊन कॉंग्रेसने देशाचा विकास केला. आता भारत देश भकास करण्याचे काम भाजपा आणि नरेंद्र मोदी, यांच्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.

पुण्याच्या आंबेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक शहा यांच्या घरवर छापा…

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२७.११.२०२१.

पुणे आंबेगाव,एका प्रसिद्ध उद्योजकांच्या घरावर आयकर विभागाकाने छापेमारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र शहा, हे गृहमंत्री दिलीप वळसे, पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.आयकर विभागाच्या एका पथकाने आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास मंचर येथील पराग डेअरी छापा टाकला. तर दुसऱ्या पथकाने अवसरी येथील पीर डेअरीवर पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकला. त्यानंतर तिसऱ्या पथकाने आज सकाळी सात वाजता थेट देवेंद्र शहा, यांच्या निवासस्थानी छापा टाकला. तर चौथा छापा हा देवेंद्र शहा, यांच्या मित्राच्या घरी सकाळी सात वाजता टाकल्याची माहिती आहे.

आयटीकडून कार्यालयांची देखील झडती सुरु आहे. याशिवाय छापेमारी देखील सुरुच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये आयटीची कारवाई सुरु आहे. आयकर विभागाने आतापर्यंत शहा यांच्या पराग मिल्क उद्योग समुहावर छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या चार पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे पराग मिल्क आणि गोवर्धन उद्योग समुहाचे दुध उत्पादनात जगभरात जाळं आहे.