पिंपरी-चिंचवड मधील तहसील कार्यालयावर आंदोलन* *मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, यांना विविध मागण्यांचे निवेदन

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२३.११.२०२१.
पिंपरी, कोणतीही
अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती,व नांदेड,येथे नुकत्याच दंगली झाल्या. हजारो लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. याचा पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच, दंगली घडवणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार दिनांक.२२.११.२०२१., रोजी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. तसेच, मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, यांना तहसील अधिकाऱ्यांद्वारे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *