नगरसेवक डब्बू आसवानी का नाम मतदाता सूची से गायब,साजिश-षडयंत्र की बू

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२.१२.२०२१.
पिंपरी चिंचवड मनपा के पूर्व स्थायी समिति सभापति और राष्ट्रवादी के वरिष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी का नाम मतदाता सूची से गायब हो गया है। यह एक चौंकाने वाली खबर है। नाम जान बूझकर गायब किया गया और इसके पीछे किसी की साजिश है। यह जांच का विषय है। लेकिन डब्बू आसवानी ने आरोप लगाया है कि उनका नाम जानबूझकर मतदाता सूची से काटा गया। इसकी जांच की मांग मनपा आयुक्त राजेश पाटिल,मुख्य चुनाव आयोग,पुणे जिलाधिकारी से की है।

डब्बू आसवानी २०१७. में पिंपरी कैम्प के प्रभाग क्रमांक २१. से नगरसेवक निर्वाचित हुए है। इसके पहले भी नगरसेवक का चुनाव जीते थे। एक नगरसेवक का नाम मतदाता सूची से गायब होना घोर लापरवाही और जानबूझकर किसी की साजिश षडयंत्र करने की संभावना से इंकार नहीं किया जा सकता। आपको यह भी बताते चले कि साजिशकर्ताओं ने मतदाता सूची में उस समय नाम हटाने का षड़यंत्र रचा जब मतदाता सूची में नाम पंजिकरण का 30 नवंबर आखिर दिन था। हलांकि समय पर डब्बू आसवानी को भनक लगी और अपनी शिकायत दर्ज कराकर मतदाता सूची में नाम पंजिकरण कराने की प्रक्रिया पूर्ण की।

अतिमुसळधार पावसाची शक्‍यता – हवामान खात्याकडून ‘या’ १७. जिल्ह्यांना हाय अलर्ट

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.३.१२.२०२१.

मुंबई – कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात काही दिवसांपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही धांदल उडाली आहे.

सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण, मध्य- उत्तर महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान खात्याने आज एकूण १७. जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार, या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड, आणि उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

संबंधित जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मा.आयुक्त राजेश पाटील, साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व प्रभाग क्रमांक ३०. दापोडी तील कष्टकरी व हातगाडी अतिक्रमण या बाबतीत थांबवण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले.

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.३०.११.२९२१.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.आयुक्त राजेश पाटील, साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व प्रभागातील गोरगरीब कष्टकरी हातगाडी व पथारीधारकांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने होनारी हिटलरशाही कारवाई तूर्तास थांबविण्यात यावी याबाबत निवेदन देताना नगरसेवक राजाभाऊ बनसोडे,नगरसेविका स्वाती माई काटे,रविंद्र कांबळे,अक्षय गायकवाड,रमेश कांबळे,

थेरगाव सोशल फाउंडेशन तर्फे महारक्तदान शिबीर संपन्न २६३. जणांचे विक्रमी रक्तदान फाउंडेशनच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.१.१२.२०२१.
२६/११. शहिदांना श्रद्धांजली व संविधान देनाचे औचित्य साधून थेरगाव सोशल फाउंडेशन तर्फे शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते,यामध्ये थेरगाव तसेच पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी विद्यार्थी महिलांनी तसेच पोलीस अधिकारी मंडळींनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला व विक्रमी २६३. रक्त पिशव्या चे सकलन केलें पिंपरी चिंचवड शहरात अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे थेरगाव, सोशल फाउंडेशन चे सर्वत्र कौतुक केले जात आहे, अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात याचा पुढाकार पाहास मिळणार आहे.

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.१.१२.२०२१.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे की
मागील १५. दिवसांमध्ये परदेशातुन शहरात आलेल्या नगरीकांची माहिती कोविड हेल्पालाईन क्रमांक ८८८८००६६६६ वर कळविण्यात यावी.आसे आव्हान करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३०.दापोडी, विठ्ठल मंदिर वरील आळी येथे डांबरीकरण रस्त्याचे काम सुरु

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक.३०.११.२०२१.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३०.दापोडी
विठ्ठल मंदिर वरील आळी येथील डांबरी करण काम कार्यक्षम नगरसेवक रोहित आप्पा काटे, आणि संजयभाऊ कणसे, स्वि .नगरसेवक यांच्या प्रयत्नातून काम सुरू करण्यात आले.

पिंपरी . चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील बोपखेल-दापोडी जाणारया हक्काच्या रस्ता साठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकावरील गुन्हे माफ करण्यातसाठी गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांची भेट-श्री. भाग्यदेव एकनाथ घुले

*पिंपरी
संवाददाता.सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२९.११.२०२१.
बोपखेल गावच्या हक्कांच्या रस्तासाठी सुरक्षा च्या कारणास्तव ९ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता त्या मुळे बोपखेल च्या ग्रामस्थांनी रस्ता मिळवण्यासाठी आंदोलन उभे केले होते आशातच आंदोलन चिघळले गेले व त्यात अनेक माता-भगिनी -७४ वडिलधारी व पुरुष-१०२ व लहान मुलं-१३ अशी अनेक नागरिकांनवर गुन्हे दाखल करण्यात आले होते

श्री भाग्यदेव घुले म्हणाले बोपखेल च्या रस्तासाठी आम्ही नागरिक व प्रतिनिधी आदरणीय श्री. शरद पवार साहेबांनची दिल्ली येथे जनपथ-6 येथे ही भेट घेतली होती साहेबांनी त्या वेळी दिवंगत स्वरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर साहेबांनला फोन ही केला होता पण बोपखेल गावांमध्ये येण्या. जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे कष्टकरी कामगार बंधु पर्याय उरला नव्हता त्या मुळे आंदोलन पेटले व नाहक परिस्थिती ला समोर जाव लागल…
गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी लगेच सुचना केली की बोपखेल भागातील नागरिकांन वरील गुन्हे कमी करण्याचे आश्वासन दिले व लवकरच बोपखेल व उपनगरात पोलीस चौकीसाठी सुचना देतो त्या वेळी राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाचे प्रदेश सरचिटणीस शिल्पाताई बिडकर विनेश भोजे दत्ता घुले, दत्तात्रय घुले, रोहिदास जोशी, अमित टिळेकर मारुती मोरे इ. ग्रामस्थां उपस्थित होते.

दापोडीत राज्यातील आघाडी सरकार विरोधात तीन काळी मडकी फोडून भाजपाचे निषेध आंदोलन……

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२९.११.२०२१.
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर दापोडी विभागाच्या वतीने रविवार दिनांक.२८.११.२०२१. रोजी सकाळी ११.००.वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रम नरवीर तानाजी चौक दापोडी येथे प्रसारित करून उपस्थित नागरिक कार्यकर्त्यामध्ये ऐकण्यात आला व यावेळी नागरिकांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रम निमित्त नागरिकांमध्ये चहा वाटप करण्यात आला. यानंतर भारतीय जनता पार्टी दापोडी विभागाच्यावतीने महा भकास आघाडी सरकारचा तीन मडकी फोडून जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले… यावेळी भारतीय जनता पार्टीचे सचिव विशाल वाळूंजकर यांनी राज्यातील हे सरकार गोंधळलेले आहे, त्यांचा एकमेकात ताळमेळ नाही महाराष्ट्रामध्ये मालेगाव, अमरावती दंगल व चिंचवड विधानसभेचे आमदार मा. लक्ष्मण भाऊ जगताप, यांच्या बंधू वर झालेल्या कार्यालयावरचा हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे.राज्य सरकारने पेट्रोलचे इंधनकर कमी केलेले नाहीत, मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी एक मंत्री पत्रकार परिषद घेऊन तर दुसरा मंत्री एसटी कामगारांचे आंदोलन तापवत आहे. ओबीसींचे आरक्षण , राज्यातील महत्त्वाची महामंडळे बरखास्त करणे , कोरोना काळामध्ये राज्याकडून कोणतीही मदत नसताना, नागरिकांना भरमसाठ लाईट बिल काढली गेलीत. याचाच निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीन मोकळी मडकी ज्यात बुद्धी नाही ,विचार नाही, त्यांच्या कामात योग्यता नाही अशा महा भकास आघाडी सरकारचा तीन मडकी फोडून जाहीर निषेध आंदोलन करत आहोत असे वाळुंजकर,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी स्वीकृत नगरसेवक संजय कणसे ,दापोडी- पिंपरी मंडल अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर फुगे ,विशाल सातपुते, यांनी आपल्या भाषणात निषेध व्यक्त केले, व यावेळी एस.टी कामगार च्या वतीने एसटी कामगार राजकुमार कोरे, यांनी एसटी कामगारांच्या भावांना व्यथा मांडल्या… या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा सचिव विशाल वाळुंजकर, स्वीकृत नगरसेवक संजय कणसे, मंडल अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, धर्मेंद्र शिरसागर यांनी केले. आंदोलन मध्ये अनुसूचित जाति मोर्चा सरचिटणीस यशवंत दनाने, नाना ढोकले, घनश्याम सकट, सुधीर चव्हाण, अमीर शेख, राजू कानडे,महिला आघाडी प्रभाग अध्यक्ष सविता सूर्यवंशी, वंदना वाघमारे, रेहना बैग, ॲड. सीमा कोरे, विजय वाघमारे, अशोक खोले, संगम जमादार, राहुल भोसले, प्रसाद कणसे, सौरभ काळभोर अधिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक, सूत्रसंचालन विशाल सातपुते आभार घनश्याम सकट यांनी केले

महापालिका* *आयुक्त राजेश पाटील, यांच्या आदेशानुसार* *फ्लेक्स स्वतः काढून टाका* *भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार मा.महेश लांडगे, यांचे कार्यकर्ते, समर्थकांना आवाहन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२८.११.२०२१.
पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, राजकीय दबावाखाली काम करीत आहेत. मात्र, सर्व अधिकारी आपलेच पिंपरी- चिंचवडकर आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन करा आणि त्यांना सहकार्य करा. माझ्यासाठी लावलेले शुभेच्छा फ्लेक्स काढून टाका, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, यांनी केले आहे.
पिंपरी- चिंचवड शहरात आमदार मा.महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टर काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील, यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपा आणि आमदार लांडगे समर्थकामध्ये संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, भोसरीच्या गावजत्रा मैदानावर आमदार लांडगे, यांच्या वाढदिवसानिमित्त ” रंग जल्लोष…पांडू स्पेशल” हा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी सुरू होता. सुमारे ३५ हजार लोकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात आमदार मा.महेश लांडगे, यांनी आपल्या समर्थक, हितचिंतक आणि पदाधिकारी- नगरसेवक यांना भावनिक आवाहन केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३०.दापोडी येथील आंबेडकर चौक ११ नंबर बसस्थानक परिसरात नविन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.२८.११.२०२१.
प्रभाग क्रमांक ३०.दापोडी.११.नं. बस स्टॉप परिसर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात नवीन चेंबर लाईन टाकण्याचे काम नगरसेविका सौ स्वाती माई काटे. यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आले.