एस टी कामगारांची महाराष्ट्र शासनाने पिळवणूक थांबवावी शासन सेवेत समाविष्ट करून घेणे कामागाराचा अधिकारी प्रवाशयाचे देखील होत आहे मोठ्या प्रमाणावर हात उज्वला गावडे, अध्यक्षा भाजप महिला मोर्चा

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२४.११.२०२१

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुरू असलेल्या संपाबाबत वल्लभनगर आगारात भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गणेश गावडे, आणि पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी संपकरी एस टी कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही भेट घेण्यात आली,गेल्या पंधरा दिवसांपासून एस टी कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी सप सुरू आहे एस टी कामगारांचा संप सुरू असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशयाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे, अनेकांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी अनेक समस्या चा सामना करावा लागत आहे,शासनाने देखील आता या कामगारांचा सकारात्मक विचार केला पाहिजे जेणेकरून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची वाताहत होणार नाही असे भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, यांनी मतं व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *