रिंगरोडची रुंदी निम्मी करण्याच्या पीएमआरडीएच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२२.११.२०२१.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने/पीएम आरडीए / हाती घेतलेल्या रिगरोडची रुंदी कमी करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे या रिगरोडची ११०. मीटर ऐवजी ६५. मीटरची होणार आहे पीएम आरडीए ने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिगरोड विकसित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला एकुण १२८.किमी लांबीचा हा रिगरोड होता पहिल्या टप्प्यात तो ९०.मिटर रुंदीचा होता परंतु मध्यंतरी एम एस आरडीसी च्या रिगरोड प्रमाणेच तो ११०. रुंदी चा करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु त्याची रुंदी पुन्हा कमी करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव पीएम आरडीए ने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यास नगर विकास खात्याने मान्यता दिली त्याबाबत चे आदेश नगर विकास खात्याचे अवर सचिव किशोर गोखले, यांनी काढले आहे त्यावर तीस दिवसात नागरिकांना पीएम आरडीए कडे हरकती. सुचना दाखल करता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *